आमच्याविषयी माहिती (About Us)


रेषा शिक्षण संस्था (रजि.) २०१३ पासून

संचालित

रेषा गुरुकुल

 
(मातृभाषेतून शिक्षण : एक अभिनव शाश्वत शिक्षण पध्दती)...

कशी असेल शाळा ?

  • अभ्यासााचे सर्व विषय मातृभाषेतून शिकविले जातील. (गणित व विज्ञान हे विषय सेमी इंग्रजी या पद्धतीने घेतले जातील.)
  • आध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वय असणारं शिक्षण.
  • मातृभाषा आणि संस्कृतीचं संवर्धन करणारं शिक्षण .
  • स्वयं अध्ययनासाठी प्रकल्प पध्दती, विविध उपक्रम.
  • क्षेत्र भेटीच्याद्वारे संस्कृती दर्शन, व्यवस्थापन , कौशल्य विकास.
  • विद्यार्थ्यामधील विविध सुप्त गुणांच्या आणि क्षमतांच्या विकासासाठी अनेक संधी व एक व्यासपीठ उपलब्ध.
  • अद्यावत संवाद माध्यमाचा परिचयई लर्निंगची सोय .
  • विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी व त्यांचे मार्गदर्शन.
  • मराठी,इंग्रजी,हिंदी,संस्कृत या भाषेतून संवाद कौशल्य.
  • नृत्य,नाट्य,संगीत आणि विविध खेळांच्या शिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्यवस्था.
  • सूर्यनमस्कार,योगासन,प्राणायम व विविध व्यायामाचे शिक्षण.
  • विद्यार्थांच्या मूल्य मापनाची एक आगळी वेगळी प्रवेश प्रक्रिया.
  • वर्षातून दोन वेळा कुटुंब प्रबोधनमुक्त चर्चा.
  • माणूस घडवण्याची ही एक अभिनव पध्दती आहे.
  • आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपला पाल्य पुरुषोत्तम घडेल असा विश्वास आहे.
  • आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.

आमचे उपक्रम (Our Activity )


* रेषा गुरुकुल * (मातृभाषेतील शाळा )

  • रेषोद्यान - १ (Playgroup)
  • रेषोद्यान - २
    (Nursery)
  • बालोद्यान - १
    (J.Kg)
  • बालोद्यान - २ 
    (S.Kg)
  • १ ली ते ४ थी
  • * निस्वास गुरुकुल * (मातृभाषेतील शाळा )
    ५ वी ते १२ वी

पाळणाघर (DayCare)

वयोगट  
१.५वर्ष ते १२वर्ष
वेळ :- ९ ते ६
सोमवार ते शनिवार
 
  • उपक्रम व खेळातून कौशल्य विकास..
  •  
  • संस्कार वर्ग व शारीरिक विकास या उपक्रमासहित ..
  •  
  • तज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली....
  •  

कला व क्रिडा विभाग (Arts And Sports Center)

  • जिम्नॅस्टिक – (Gymnastic)
  • बुद्धिबळ - (Chess)
  • शारीरिक विकसन -
    (Fitness)
  • कथक -  
    ( Kathak)
  • भरतनाट्यम - (Bharatnatyam)
  • चित्रकला वर्ग - (Elementary & Iintermediate)
  • संस्कार वर्ग – (Personality Development )
  • नाट्य विभाग  -
    (Drama Class)
  • मोई रेषा ग्रंथालय -
    (Mooi Resha Library)
  • कथा कथन -
    (Story Telling)

दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या कार्यशाळा व स्पर्धा (पालक विभाग)

  • पालकांसाठी  ज्ञान प्रबोधिनीचे सुजाण पालकत्व शिबिर
  • शाडूमाती पासून गणपती बनविण्याची कार्यशाळा
  • दांडिया कार्यशाळा
  • सुदृढ बालक स्पर्धा
  • “मी नायिका ’’ महिला दिना  निमित्त  स्पर्धा
  • “सुंदर माझ घर”  ही संपूर्ण घरासाठी घेतलेली अनोखी स्पर्धा
  • मी लेखक स्पर्धा
  • शिक्षक पालक स्पर्धा
  • गुरुकुलासाठी तज्ञ आचार्य (शिक्षक) घडविण्याचे काम
   

दरवर्षी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे शिबिर व स्पर्धा

  • ज्ञान प्रबोधिनी पूणे या संस्थेचे चे २ री ते ७ वी च्या मुला-मुलींसाठी बाल विकास व ८ वी ते १० वी च्या मुला-मुलींसाठी  क्षमता विकसन शिबिर
  • भरतनाट्यम व कथक कार्यशाळा
  • नाट्यशास्र शिबिर (एकांकिका )
  • बुद्धिबळ कार्यशाळा
  • ९ वी व १० वी च्या मुलांसाठी कृतिपत्रिका मार्गदर्शन
  • २ ते ७ वर्ष वयोगटासाठी उन्हाळी शिबिर
  • लहानमुलांसाठी वेशभूषा,रांगोळी ,निबंध, काव्यवाचन,कथाकथन, कवितेवरून चित्र काढण्याची स्पर्धा.
  • शालेय गटासाठी वाचनप्रकल्प  - यात खालील उपक्रम घेतले जातात
    1. कथाकथन स्पर्धा
    2. लेखी परीक्षा
    3. वही लेखन स्पर्धा 
    4. किल्ले स्पर्धा
    5. आनंद शाळा 
    6. पथनाट्य स्पर्धा

सामाजिक स्तरावर घेतलेले उपक्रम

  • मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने चॉकलेटच्या किंमतीत ख्यातनाम लेखिका सौ.माधुरी माटे यांची पुस्तके उपलब्ध आहेत.
  • जीवन गौरव पुरस्कार  (दर दोन वर्षांनी )
  • नूतन प्राथमिक विद्यामंदिर अंबड (आर्थिक दुर्बल गटातील ३३ वर्षे जुनी शाळा १ ली ते ७ वी मुले व मुली यांच्यासाठी)
  • नूतन शाळेतील मुलांकडून दिवाळीत तयार करून घेतले जाणारे उपक्रम (रंगीत पणती/ आकाशकंदील/ अत्तर/उटणे/रांगोळी चे छोटे पाकीट तयार करणे.)
  • कौशल्य दत्तक पालक योजना. (नूतन प्राथमिक विद्यामंदिर अंबड ह्या शाळेतील मुलांसाठी)

रेषा शिक्षण संस्थेस खालील संस्थाचे सहकार्य व मार्गदर्शन

  • साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान  (रजि.)

  • निराधार स्वावलंबन समिती (रजि.)

  • अर्थनिती फाउंडेशन (रजि.)

  • अध्यापन कौशल्य विकसन व संशोधन संस्था
 

रेषा विषयी थोडक्यात माहिती




श्रीमती रोहिणी ताई बलंग

कुलगुरू (नाशिक विभाग)

  • शिक्षणाच्या बाबतीत भारताची परंपरा महान आहे. सर्वार्थानं माणूस घडविण्याचे शिक्षण देण्याची भारतीय परंपरा आहे. परंतु परकियांच्या राज्यात मानसिक गुलामगिरीने शिक्षणात दुर्बलता आली आहे. आणि अजुनही परकियांचीच पद्धती चालू आहे.त्यात बदल व्हायला हवा आहे.
  • म्हणुन अशा पद्धतीचा विकास घडवून आणणारे शिक्षण देणाऱ्या गुरूकुल शिक्षण पद्धतीच्या शाळा असण्याची आवश्यकता आहे . अर्थात आधुनिक कलांशी सांगड घालत हातात हात घालून चालतील अशा रेषा गुरुकुल सारख्या शाळा हव्यात तरच समाजाला,पर्यायाने देशाला स्थैर्य मिळेल.
  • नोकरीसाठी, व्यवसायासाठी शिक्षण एवढीच व्याख्या शिक्षणाची असे वाटते.शिक्षणाने मनाची जडणघडण होणे,संस्कार होणे हे अपेक्षित आहे.
  • बौद्धिक,शारीरिक,मानसिक, भावनिक इ.सर्वांगीण पातळीवर विकास होऊन सर्व समाजाच्या, देशाच्या विकासासाठी उपयोगी पडणाऱ्या शिक्षण पद्धतीत बद्दल होणे अत्यंत आवश्यक आहे.

संदेश


कुलगुरू डॉ. बाबा नंदनपवार

  • आपली भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीचं सातत्यानं जतन, संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण केलय ते कुटुंब (घर) या संस्थेनं आणि गुरुकुल या शिक्षण केंद्रानं.
  • कुटुंबात मुलांना संस्कार मिळायचे, त्याचं भावविश्व समृद्ध व्हायचं. गुरुकुलात आचार्यांच्या प्रेमळ सहवासात आणि मार्गदर्शनात त्याच्या बुद्धीचा विकास व्हायचा. विविध शास्त्र-ग्रंथांचा अभ्यास व्हायचा..
  • जीवन कौशल्य आत्मसात करातांनाच व्यक्ती जीवनाला नैतिक मूल्यांची अध्यात्मिक बैठक प्राप्त व्हावी असा गुरुकुलाचा प्रयत्न आणि आग्रह ही असायचा म्हणूनच, आपली संस्कृती सांगते - ' मातृ देवो भव ! पितृ देवो भव ! आचार्य देवो भव !’
  • आजवर देशावर झालेल्या अनेक सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आक्रमणामुळे कुटुंब आणि शिक्षण संस्थांवर दूरगामी परिणाम झालेत. इंग्रजी राजवटीत मेकॉले प्रणित शिक्षण पद्धती सुरु झाली. परिणाम पाच्छात्य अंधानुकरण होऊ लागलं.
  • २० व्या शतकाच्या उत्तरार्धात तर तंत्रविज्ञान, प्रचार प्रसार माध्यमाचा विस्फोट झाला. सारं जग हाकेच्या अंतरापेक्षाही जवळ आलं. आपल्या सुखाच्या कल्पना, जीवनशैली बदलली. साधनातच सुखाचा शोध त्यामुळं, साधनांचा हव्यास. त्यासाठी हवा पैसा. म्हणून अधिकाधिक पैसा हेच जीवनाचं ध्येय होऊ लागलं.
  • जगायचं कशासाठी ? पैसा मिळविण्यासाठी ? शिकायचं कशासाठी ? परीक्षा पास करण्यासाठी , करिअर करण्यासाठी व त्याआधारे अधिक पैसा मिळविण्यासाठी. या दुष्टचक्रात आपण सापडल्यामुळं आपली कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली.
  • घरं, मनं संकुचित झाली, नाती ठिसूळ झाली, माणूसपण, संवेदनशीलता हरवत चालली. घराचे बंगले, फ्लॅट होत आहेत आणि गुरुकुल,शाळा पब्लिक स्कूल होत आहेत. सामाजिक बांधिलकी, राष्ट्रनिष्ठा याचाही विसर पडत चाललायं. एका संभ्रमावस्थेत पालक आहे.
  • अशा परिस्थितीत नागपूरला डॉ.बाबा नंदनपवार यांनी घर आणि शाळा यांच्या सहकार्य व समन्वयातून ३५ वर्षांपूर्वी गुरुकुल सुरु केलं आणि माणूस म्हणून घडण्याचा व घराची घsर घsरs थांबविण्याचा यशस्वी प्रयोग केला.
  • असं गुरुकुल आपल्या नाशिकमध्येही सुरु व्हावं असं रेषा प्रतिष्ठानला वाटलं. म्हणून डॉ.बाबा नंदनपवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेषा गुरुकुल सुरु केले आहे : आपण सुजाण पालक असल्यामुळं आपण ह्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद द्याल असा विश्वास आहे.

संदेश



श्रीमती कुमुदिनी ताई फेगडे

अध्यक्ष (नाशिक विभाग)

आपण आमच्या गुरुकुलात मुलांचा प्रवेश का घ्यावा ?

कारण -

  • गुरुकुलाची संस्कृती,संस्कार , सभ्यता आधुनिक ज्ञानाचा सुरेख मेळ.
  • अभ्यासक्रमा बरोबरच अभ्यासेतर कला व कार्यक्रमांचा समावेश.
  • अध्यात्म , विज्ञान तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम.
  • चारही भाषांवर - मराठी , इंग्रजी , हिंदी संस्कृत - वर प्रभुत्व
  • या भाषा वाचता , लिहिता संवाद साधणे येण्याला प्राधान्य.
  • जुन्यातील सोने व नव्यातील हिरे - माणिक यांच्या सहयोगाने जडण- घडण होऊन आपले पाल्य सर्वार्थाने पुरुषोत्तम घडतील.
  • पाल्याच्या अंगी असणारे कौशल्य गुण त्यानुसार मार्गदर्शन.
  • उत्तम माणुस व सुजाण नागरिक घडतील हा आमचा विश्वास.
  • तो सार्थ करण्यासाठी आपण पाल्यांना प्रवेश दया.

संदेश

 

छायाचित्र विभाग (Gallery)


रंगपंचमी दिवस

शिवजयंती उत्सव

गुढीपाडवा उत्सव

 

रक्षाबंधन उत्सव

सहल

दहीहंडी उत्सव

 
स्वा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

महिला दिन स्पर्धा

साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान

Get In Touch

Resha Daycare Playgroup Nursery

reshasanstha2019@gmail. com

9850019606 / 9822011967 / 8378997138

Office Timing : 9 Am to 6 Pm

Follow Us

Visitor Counter

© RESHA DAY CARE . All Rights Reserved. Designed by FLYCTSOFTTECH